तीन वर्षात ३९ लढाऊ विमानांना अपघात

तीन वर्षात ३९ लढाऊ विमानांना अपघात

मागील तीन वर्षात १४ हेलिकॉप्टरसह ३९ लढाऊ विमाने दुर्घटनाग्रस्त झाल्याची माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी लोकसभेत दिली.

२०१२-१३, २०१३-१४, २०१४-१५ आणि यावर्षी जुलैपर्यंत विविध अपघातांमध्ये ३९ लढाऊ विमाने दुर्घटनाग्रस्त झाली. यात १४ हेलिकॉप्टर आणि दोन ट्रेनरचा समावेश आहे. या अपघातात संरक्षण दलाच्या ३६ जवानांचा मृत्यू झाला.

तर तब्बल चार लाख ४३ हजार ८०० रुपयांचे नागरी मालमत्तेचे नुकसान झाल्याचे पर्रिकर यांनी सांगितले.

गेल्या चार दशकांपासून विमान दुर्घटनांचे प्रमाण कमी होत आहे. १९७०च्या दरम्यान दर वर्षाला होणा-या अपघातांचे सरासरी प्रमाण २९ इतके होते. २००१-१०पर्यंत हे प्रमाण वर्षाला १७ पर्यंत कमी झाले .  तर २०११-१५ या चार वर्षात हे प्रमाण सरासरी नऊपर्यंत आले. तसेच मागील पाच वर्षांपासून हेलिकॉप्टर दुर्घटनांचे प्रमाणही कमी झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *