माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या तीन मारेकऱ्यांना फाशी देण्यात यावी, यासाठी केंद्र सरकारने दाखल केलेली पुनर्विचार याचिका (क्युरेटिव्ह पेटिशन) आज (बुधवार) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे राजीव गांधींच्या मारेकऱ्यांनी फाशी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची फाशीची शिक्षा यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने रद्द करून जन्मठेपेमध्ये रुपांतरीत केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर सरकारने 21 जुलैला क्युरेटिव्ह पेटिशन दाखल केली होती. यामध्ये म्हटले होते, की राजीव गांधींचे मारेकरी कोणतीही दया दाखविण्याच्या पात्रतेचे नाहीत.
राजीव गांधी यांचे मारेकरी असलेल्या मुरुगन, संथन आणि अरिवू यांची फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेप करण्यात आली होती.
