तालिबानी नेता मुल्ला ओमरचा मृत्यू ?

तालिबानी नेता मुल्ला ओमरचा मृत्यू ?

अफगाणिस्तानातील तालिबानचा प्रमुख नेता मुल्ला ओमरचा मृत्यू झाल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. मुल्ला ओमरच्या मृत्यूबद्दल तालिबानने कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे बीबीसीने म्हटले आहे.

मुल्ला ओमरने त्याचा एक डोळा गमावला होता. एका डोळयाने लढाई लढणारा मुल्ला ओमर तालिबानचा अफगाणिस्तानातील सर्वोच्च नेता होता. मागच्या तेरावर्षांपासून मुल्ला ओमर सार्वजनिक जीवनापासून दूर होता.

दहशतवाद्यांमध्ये इसिसचे वाढते महत्व रोखण्याच्या उद्देशाने एप्रिल महिन्यात अफगाणिस्तान तालिबानने मुल्ला ओमरचे चरित्र प्रकाशित केले होते. मागच्या काही वर्षांपासून मुल्ला ओमर फारसा सक्रीय नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *