पीडित बलात्कारित युवतीला जिवंत जाळले

एक वर्षापूर्वी बलात्कार झालेल्या सतरा वर्षाच्या पीडित युवतीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी आज (बुधवार) दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी अहरुअला नवाझी गावामध्ये सतरा वर्षाच्या युवतीवर विजय नावाच्या युवकाने बलात्कार केला होता. विजय त्याच्या मित्रांसोबत मंगळवारी (ता. 28) पीडित युवतीच्या घराबाहेर आला होता. त्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले.

पीडित युवतीला उपचारासाठी अलिगड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकारी प्रमोद कुमार यांनी दिली.

दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *