‘जनतेच्या राष्ट्रपती’ला वाळूशिल्पातून श्रद्धांजली

‘जनतेच्या राष्ट्रपती’ला वाळूशिल्पातून श्रद्धांजली

प्रसिद्ध वाळूशिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली म्हणून मंगळवारी पुरी येथील समुद्रकिनाऱ्यावर त्यांचे शिल्प साकारले.

‘सामान्य माणूस, मिसाईल मॅन, भारतरत्न, जनतेच्या राष्ट्रपतीला आदरांजली‘ असा संदेश या चार फूट उंच वाळूशिल्पावर नाईक यांनी लिहिला आहे.
ज्यावेळी वाळूशिल्प सर्वज्ञात नव्हते तेव्हा डॉ. कलाम यांनी पहिल्यांदा 2005 मध्ये नाईक यांना राष्ट्रपती भवनात बोलावून घेऊन त्यांचे कौतुक करीत त्यांना विशेष प्रोत्साहन दिले होते, अशी आठवण यावेळी नाईक यांनी आवर्जून सांगितली.

‘तो माझ्यासाठी एक मोठा सन्मान होता. डॉ. कलाम यांनी स्वतःच्या खात्यातून मला तीन हजार रुपयांचा धनादेश तेव्हा दिला होता. आज आपण देशाच्या मिसाईल मॅनला, जनतेच्या राष्ट्रपतीला मुकलो आहोत. चांगल्या हृदयाचे आणि सुंदर मनाचे कलाम हे देशातील तरुणांसाठी प्रेरणास्थान होते.‘

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *