समलैंगिक विवाह जाहीरातीला भरभरुन प्रतिसाद

समलैंगिक विवाह जाहीरातीला भरभरुन प्रतिसाद

वर्तमानपत्रात प्रसिध्द होणा-या सामान्य विवाहाच्या जाहीरातींना वधू आणि वर पक्षाकडून नेहमीच भरभरुन प्रतिसाद मिळतो. अलीकडेच समलैंगिक विवाहासाठी मुंबईच्या एका वर्तमानपत्रात जाहीरात प्रसिध्द झाली होती.

पदमा अय्यर या महिलेने आपल्या समलैंगिक मुलाच्या विवाहासाठी मुंबईतील एका वर्तमानपत्रात दिलेल्या जाहीरातीला भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे. समलैगिंक विवाहासाठी वर्तमानपत्रात दिलेली भारतातील ही पहिली जाहीरात होती.

हरीश या आपल्या समलैंगिक मुलाच्या विवाहासाठी त्यांनी ही जाहीरात दिली होती. हरीशला विवाहासाठी आतापर्यंत ७० हून अधिक प्रस्ताव आले आहेत. या प्रतिसादासाठी पदमा यांनी जाहीरातीचे आभार मानले आहेत.

२५ ते ४० वयोगटातील समलैंगिक, प्राणी प्रेमी, शाकाहारी, जातीचे बंधन नाही पण अय्यर असल्यास प्राधान्य अशा अपेक्षा त्यांनी जाहीरातीत ठेवल्या होत्या. हरीशने सोशल मिडीयावर पोस्ट केल्यानंतर ही जाहीरात सर्वत्र व्हायरल झाली.

बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात सोशल मिडीयावरुन या जाहीरातीचा प्रसार झाला. भारतातून नव्हे तर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, युके आणि सौदी अरेबिया या देशातून हरीश बरोबर विवाह करण्यासाठी विचारणा झाली आहे. पदमा यांना ७३ मेल आले असून, यात मुलाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.

या प्रतिसादाने हरीश भारावून गेला आहे. अन्य समाजांबरोबर अय्यर समाजातून हरीशला प्रस्ताव आले आहेत. अनेक प्रस्ताव हरीशच्या अपेक्षांना अनुकूल आहेत त्यांना विवाह करायचा आहे मात्र ते मासांहारी असल्याचे हरीशने सांगितले.

अबूधाबीवरुन आलेल्या एका प्रस्तावामध्ये विवाहानंतर राजवाडयासारख्या घरात रहायला जाण्याचे आश्वासन दिले आहे. ज्या प्रमाणात कौतुकाचे मेल आले आहेत त्याचप्रमाणे जातीला प्राधान्य दिल्यामुळे कडवट टिका करणारे, विरोधाचेही पदमा यांना ३००  मेल्स आले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *