देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर

देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

२७ जुलै २०१५ ते दोन ऑगस्ट २०१५ हे सात दिवस राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. मात्र सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही.

हे सातही दिवस सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यापर्यंत उतरवण्यात येतील तसेच मनोरंजनात्मक सरकारी कार्यक्रम होणार नाहीत.

सोमवारी संध्याकाळी शिलाँग येथे कलाम यांचे हद्यविकाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव गुवाहाटीवरुन दिल्लीला आणण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *