नियतीची खेळी… वडिलांप्रमाणेच मुलालाही वीरमरण!

नियतीची खेळी… वडिलांप्रमाणेच मुलालाही वीरमरण!

पंजाबमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस अधिक्षक बलजीत सिंह हे शहीद झाले. तसंच बलजीत यांच्या वडिलांना देखील अशाच प्रकारे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण प्राप्त झालं होतं.

बलजीत सिंह यांचे वडील अचारी सिंह हे पोलीस निरीक्षक होते. त्यावेळेस दहशतवाद्यांनी कट रचून त्यांची रोड अपघातात हत्या केली होती. बलजीत सिंह हे काल झालेल्या दहशतवाद्यांविरुद्ध सुरु असलेल्या ऑपरेशनचे नेतृत्व करीत होते. मात्र तेव्हाच नियतीने घात केला अन् दहशतवाद्यांच्या एका गोळीने बलजीत सिंह यांचा वेध घेतला. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

बलजीत सिंह यांचे वडील 1984 रोजी शहीद झाले होते. अचारी सिंह हे पोलीस निरिक्षक होते. वडिलांच्या निधनानंतर बलजीत सिंह 1985 साली एएसआय पदी तैनात झाले. डेप्युटी कमांडेट होण्यापूर्वी ते फगवाडातील एसएचओ आणि मनसामध्ये गुप्तचर विभागात तैनात होते. त्यानंतर त्यांनी पोलीस अधिक्षक म्हणून गुरुदासपूरमध्ये कार्यभार स्वीकारला होता. मात्र, कालच्या दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *