बोरीवली – विरार रेल्वे वाहतूक ठप्प

मुसळधार पावसानं आज सलग चौथ्या दिवशी  वसई – विरार – नालासोपारा भागाला झोडपून काढलंय. रात्रभर झालेल्या पावसानं बोरीवली-विरार दरम्यानची लोकल वाहतूक ठप्प आहे. पण बोरीवली ते चर्चगेट लोकल  वाहतूक सुमारे १० मिनिटं उशीरानं सुरु आहे. अनेक भागात पाणी साचल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे.

मिठागराच्या वस्तीत अजूनही पाणी साचलेलं आहे… तर वसईच्या समता नगर, साई नगर, आनंद नगर, पंचाळ नगर, सनसिटी परिसर तर नालासोपऱ्यात तुलिज़, टाकीं रोड, स्टेशन परिसरातील वीज पुरवठा खंडित आहे.

तर विरारमध्येही स्टेशन परिसर, विवा कॉलेज परिसर अशा अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *