मुलुंडमध्ये साडेतीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार

मुलुंडच्या  गवाणपाडा परिसरात एका साडेतीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलुंडच्या गवाणपाडा परिसरामधील एका काम सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकाम साइटवर ही घटना घडली . या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती . पण या मुलीचे नातेवाईक दहशतीखाली होते. अखेर एका महिलेने या संदर्भातील माहिती मुंबई पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी सावरकर रुग्णालयात धाव घेत या गुन्ह्याचा तपास सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *