राइस मिलमध्ये १ कोटी ८५ लाखांचा घोटाळा

राइस मिलमध्ये १ कोटी ८५ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी चौघांवर जुना राजवाडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लामपूर एमआयडीसी येथील बाहुबली राईस मिलचे मालक विजय माणिक देसाई, त्यांची पत्नी संगीता ऊर्फ विजया विजय देसाई, मुलगा प्रतीक आणि दिग्विजय देसाई (रा. सर्व शिवछाया अपार्टमेंट, ताराबाई पार्क, कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी यांच्यावर जुना राजवाडा पोलिसांत अपहाराचा गुन्हा दाखल झाला. शहाजी पांडुरंग कारंडे (वय ३१, रा. बेले, ता. करवीर) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

शहाजी कारंडे हे लेखापरिक्षक आहेत. त्यांनी मंगळवार पेठ येथील जीडीके फूडस् प्रायव्हेट लिमिटेड आणि बाहुबली राईस मिल यांचे लेखापरिक्षण केले होते. त्यावेळी झालेल्या तपासणीत प्रत्यक्षात कंपनीची स्थिती आणि लेखापरीक्षण अहवालातील नोंदी यात मोठी तफावत आढळली. दोन्ही संस्थांच्या लेखापरिक्षणात या संस्थांमध्ये दोन वर्षांच्या कालावधीत १ कोटी ८५ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे आढळून आले होते. तसा लेखापरीक्षण अहवालही त्यांनी दिला होता.

त्यानुसार या मिलचे मालक विजय देसाई व त्यांच्या कुटुंबीयांवर अपहाराची जबाबदारी निश्चित केली होती. त्यांनी ६३ लाख ४५ हजार १४५ रुपयांपैकी २६ लाख ३४ हजार रोख व २७ लाख ६५ हजार रुपयांच्या रिकाम्या बॅगा तांदूळ, ९ लाख ४५ हजार रुपयांची भात कांडप करणारी यंत्रसामग्री असा एकूण १ कोटी ८५ लाख ८६ हजार रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत कारंडे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे कारवाईसाठी अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने याबाबत तपास करून अहवाल सादर करण्याची जुना राजवाडा पोलिसांना आदेश दिला होता. त्यानुसार त्यांच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक मानसिंग खोचे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *