टीव्ही कलाकारांना ब्लॅकमेल करणाऱ्या भामट्याला रंगेहाथ अटक

नच बलिये  या रियालिटी शोमधील दोन कलाकरांना ब्लॅकमेल करीत 25 लाखांची मागणी करणाऱ्या अमित वारिक याला ओशिवरा येथे मुंबई पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.

‘नच बलिये’तील करण पटेल आणि ऋत्विक तंजानी या दोन कलाकरांच्या सेटवरील काही गप्पा सुरु असताना अमितने शुटींग करुन त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोन्ही कलाकार काही व्यक्तींबाबत आक्षेपार्ह  बोलत होते. त्याचवेळी अमितने हा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर त्याने 25 लाखाच्या मागणी केली. जर आपल्याला पैसे दिले नाही तर आपण ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल करु अशी धमकीही त्याने दिली होती.

दोन्ही कलाकारांकडून 15 लाखाची रोकड घेताना पोलिसांनी अमितला रंगेहाथ अटक केली. आरे पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *