फ्लॅट दाखवण्याच्या आमिषाने महिलेवर बलात्कार

फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने उदय मनोहर पोवार (रा. महाराणा प्रताप चौक, कोल्हापूर) याने बलात्कार केल्याची फिर्याद महिलेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. याबाबत पोवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेचे पती आणि पोवार यांची तोंडओळख आहे. या ओळखीतून पोवार याचे पीडित महिलेच्या घरी जाणे-येणे होते. नवीन फ्लॅट दाखवण्याच्या बहाण्याने महिलेस कदमवाडी येथील फ्लॅटमध्ये नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केला. याशिवाय पोवार याने पाच तोळे सोन्याचे दागिने काढून घेऊन फसवणूक केली, असा उल्लेख पीडित महिलेने फिर्यादीत केला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *