झाड कोसळून सहा जखमी

जोगेश्वरी येथील मेघवाडी पोलिस ठाणे व श्रमिक विद्यालयाच्या परिसरात बुधवारी दुपारी झाड कोसळून चार वर्षांच्या मुलासह सहा जण जखमी झाले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कीर्ती मनोल (३६), कविता जयस्वाल (३०), धनजी जाधव (७०), पूनम नाईक (३५), रंजना मौर्या (२०) आणि कार्तिक मौर्या (४) अशी या दुर्घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत. या सर्वांच्या मान, डोके आणि हातांना मार लागला आहे, अशी माहिती ट्रॉमा केअर सेंटरमधून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *