मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आश्रय कक्ष, टप्पा-२ अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थानांच्या चाव्यांचे वितरणाचा कार्यक्रम आज पार पडला. कुलाबा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चावी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी एक मोठी घोषणा केली आहे. 2028 पर्यंत सगळ्यांना कर्मचाऱ्यांना सेवानिवासस्थान उपलब्ध होईल,असं अश्वासन त्यांनी दिलं आहे.
कुलाबा येथे आज मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कर्मचारी निवासस्थानांच्या चाव्या वितरणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ‘आश्रय योजनेच्या घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम पार पडतोय. आज सर्वात पहिल्यांदा आपल्या सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस अतिषय महत्त्वाचा आहे. कारण बीएमसीने आज अतिषय उत्तम कामगिरी केली आहे. वर्षानुवर्षे दीडशे चौरस फुटाच्या पडक्या घरात राहत होते. तिथे सामूहिक स्वच्छतागृहाची व्यवस्था होती. कोणतीही सोय नव्हती. अशा ठिकाणी राहणारे. आमचे सर्व मुंबई महानगपालिकेचे कर्मचारी मुंबई स्वच्छ ठेवणारे कर्मचारी यांनी 300 चैरस फुटाचे घर त्यांना मिळाले आहे.’
अतियश सुंदर इमारत त्यांनी बांधली आहे. अशाप्रकाचे आधी मोठ्या खासगी इमारत व्हायच्या. पहिल्यांदा पालिकेची इमारत अशाप्रकारच्या टेक्नलॉजीने तयार झाली आहे या इमारतीचे 100 वर्षाचे आयुष्य आहे. 10 वर्षांपर्यंतचा मेंटेनन्स विकासक देणार आहे. त्यामुळे रहिवाशांना 10 वर्षे फक्त राहायचे आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आपले जे सफाई कर्मचारी सर्वांचं आरोग्य उत्तम ठेवतात. ते स्वतः अस्वच्छेतेत काम करुन मुंबई स्वच्छ ठेवतात. पण त्यांचं जीवन अतिषय खुराड्यासारख्या अशा घरांमध्ये व्यतित होत होतं. आशियातील सर्वात मोठ्या पालिकेचे कर्मचारी अशा पद्धतीने राहतात ही काही भूषणावह गोष्ट नव्हती. पण आज ही निवासस्थाने पाहिल्यानंतर आम्हालाही समाधान झाले आहे. मला विश्वास आहे की, 2028 पर्यंत सर्व सफाई कर्मचाऱ्यांना सेवा सेवानिवासस्थान उपलब्ध होईल. ते निवृत्त झाल्यानंतर जर त्यांचा मुलगा त्या ठिकाणी कामाला लागला तर घर त्याच्या नावे ट्रान्सफर होतं, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
