यमुना एक्स्प्रेस वेवर लढाऊ विमानाचं लँडिंग

यमुना एक्स्प्रेस वेवर लढाऊ विमानाचं लँडिंग

मथुरा : उत्तर प्रदेशातील मथुराजवळ यमुना एक्सप्रेस वेवर चक्क भारतीय हवाई दलाच्या दोन लढाऊ विमानाचं आज लँडिंग करण्यात आलं. ही एक चाचणी होती, जी यशस्वी झाली.

आपत्कालीन स्थितीत दिल्ली-लखनौदरम्यान एक्स्प्रेस वेवर लढाऊ विमान लँड केलं जाऊ शकतं की नाही तसचं अशा परिस्थितीत देशाची यंत्रणा सज्ज आहे की नाही, हा या चाचणीमागील हेतू होता. मथुरा-यमुना एक्सप्रेस वेच्या कारब या गावाजवळ ही चाचणी झाली.

आज सकाळी साडे सहाच्या सुमारास मिराज-2000 हे लढाऊ विमान एक्स्प्रेस वेवर लँड झालं. तब्बल 118 किलोमीटरच्या पट्ट्यात ही ट्रायल झाल्यानं एक्सप्रेस वे वर मोठी वाहतूक कोंडीही झाली. यमुना एक्स्प्रेस पहाटे तीन वाजल्यापासून सामान्य लोकांसाठी बंद करण्यात आला होता.

त्याआधी हवाईदलाने अशा लँडिंगसाठी सरावही केला होता. मात्र आजच्या चाचणीबाबत कोणतीही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे विमान चक्क एक्सप्रेस वे वर धावताना दिसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काही बसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *