कुंभमेळ्यात मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान मंचावर साध्वीचा गोंधळ

कुंभमेळ्यातील मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यानच एका साध्वीनं व्यासपीठावरच गोंधळ घातला. साध्वींच्या आखाड्याला मान्यता मिळावी अशी मागणी करत साध्वीने गोंधळ घातला.

आपल्या मागणीसाठी संबंधित साध्वीने प्रशासन आणि आखाडा परिषदेचीही भेट घेतली होती. मात्र साध्वींच्या या मागणीवर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळं आज साध्वी यांनी थेट व्यासपीठाचाच ताबा घेतला.

त्यामुळं काही वेळ व्यासपीठावर गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.त्यानंतर मंहतांनी या साध्वीची समजूत काढून व्यासपीठावरुन खाली आणलं. मात्र यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या समोरच व्यासपीठावर एकच गोंधळ पाहायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *