तेलंगणामध्ये ‘गोदावरी-पुष्करम्’दरम्यान चेंगराचेंगरी, 12 भाविक ठार अनेकजण जखमी

तेलंगणामध्ये ‘गोदावरी-पुष्करम्’दरम्यान चेंगराचेंगरी, 12 भाविक ठार अनेकजण जखमी

नाशिक इथ कुंभमेळा होतो पण अगदी याच धर्तीवर तेलंगणात महापुष्कर अर्थात कुंभमेळा होतो आहे. गोदावरी तीरावर असलेल्या बासर इथ हा महापुष्कर होतो आहे. मात्र, या कुंभमेळ्याला गालबोट लागलं. भाविकांच्या गर्दीमुळं चेंगराचेंगरीत 12 जण ठार झाले तर अनेकजण जखमी झाले आहेत.

खरंतर या मेळाव्यासाठी तब्बल २३०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र तरीही चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

स्वतंत्र तेलंगणाच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच महापुष्कर होत असल्याने हा सोहळा भव्यदिव्य होण्यासाठी तेलगणा सरकारनं पूर्ण ताकद लावली आहे. तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातलं बासर देवी सरस्वतीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण देशात सरस्वतीची दोनच मुख्य मंदिरे आहेत. एक हिमालयात आणि दुसरे बासर शहरात आहे.

दर १२ वर्षांनी बासर इथं पुष्कर मेळावा होतो. पण तब्बल १४४ वर्षांनी बृहस्पतीचा सिंह राशीत प्रवेश होतो आहे. त्यावेळी हा पुष्कर मेळावा होतो. यंदाचा पुष्कर मेळावा महापुष्कर म्हणून ओळखला जातो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *