भिवंडीमध्ये भंगार गोदामांना भीषण आग

भिवंडी येथे सरदार कंपाऊंडमधील भंगार गोदामांना भीषण आग लागली आहे. आग इतकी मोठी आहे की या भागात असलेली २३ गोदामं जळून खाक झाली आहेत. पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी आहेत. अद्याप आग आटोक्यात आलेली नाही.

उल्हासनगर, कल्याण आणि भिवंडी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचं काम करत आहेत. आग अजूनही धुमसत असल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. याच भागात प्लास्टिकची गोदामं असल्याने आग आणखी वाढण्याची शक्यता आहे. आगीत काही रहिवासी घरं देखील खाक झाल्याचं कळतं. आतापर्यंत १५ ते २० जणांना आगीतून वाचवण्यात यश आल्याचीही माहिती समोर आलीय. धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर परिसरात पसरत असल्याने रहिवाशांना श्वसनाचा त्रास होत आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *