दौंडमध्ये स्टील कंपनीत स्फोट, सहा गंभीर जखमी

दौंड तालुक्यातील भांडगाव येथील एका कंपनी स्फोट झाला आहे. मीनाक्षी कंपनी हा स्फोट झाला असून या स्फोटात ६ ते ७ कर्मचारी गंभीर झाल्याची माहिती आहे. हा स्फोट कशामुळे झाला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मीनाक्षी स्टीलची कंपनी आहे. काम सुरू असताना क्रेनमधील केमिकलचा टार्क एका टाकीत पडला त्यामुळे हा स्फोट झाला. यामुळे या स्फोटात सहा जण जखमी झाले आहे. यातील चार जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.

क्रेनचा लोखंडी भाग तुटून केमिकल टाकीत पडला, आणि टाकीचा स्फोट झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *