पिना आणि बायकांचं अगदी घनिष्ठ नातं. पर्समध्ये दुसरं काहीही नसलं तरी चालेल, पण अनेकींना अडी-निडीला सेफ्टी पिना हव्याच असतात. केसांना गजरा माळण्यापासून ते रस्त्यात चप्पल अचानक तुटल्यावर ती तात्पुरती का होईना, पण टाचण्यासाठी पिन लागतेच. स्वत:च्या उपयोगाबरोबर मैत्रिणीच्या अडी-अडचणीला धावून जाण्यासाठीही पिना फायदेशीर ठरतात. सेफ्टी पिना म्हणजे बायकांची जीवनोपयोगी गोष्ट.
पण हीच गोष्ट बायकांच्या जिवावरही उठू शकते. श्रीनगरमधील ‘गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज’च्या डॉक्टरांनी यासंदर्भात केलेला अभ्यास पिना वापरणा:या बायकांना धोक्याची सूचना देतो.
ओढणी, साडीचा पदर उडू नये म्हणून बायका सेफ्टी पिना लावतात. पण चेहे:याला बांधलेला स्कार्फ निसटू नये म्हणून स्कार्फलाही पिना लावतात. या पिना दिसू नये म्हणून त्या आतून लावतात. तोंड, नाक याच्याशी या पिनांचा संबंध येतो. अभ्यास करणा:या डॉक्टरांच्या मते ही दुर्लक्ष करण्यासारखी बाब खचितच नव्हे. या पिनांमुळे श्वसनाचे विकार होतात, तसेच अपघातही घडतात.
बाहेरच्या गोष्टींमुळे अॅलर्जीसदृश श्वसनाचे विकार लहानांपासून वृध्दांर्पयत आढळून येतात. कोणाला शेंगदाणो, विशिष्ट बिया, प्लॅस्टिक किंवा रबरी खेळण्यांमुळे श्वसनाचे विकार होऊ शकतात. पण पिनांमुळेही श्वसनाचे विकार होतात हे डॉक्टरांनी अभ्यासानं सिध्द केलं आहे. पिनांमुळे श्वसनाचे विकार होणा:यांना प्रामुख्यानं कफाचा त्रस होतो.
तसेच पिनांमुळे अपघातही घडू शकतात. बायका पिना लावताना प्रामुख्यानं तोंडाचा वापर करतात. ओढणी, पदर आणि नि:यांना पिन लावताना आधी पदर, ओढणी, नि:या नीट कराव्या लागतात. त्यावेळेस पिनेचं तोंड उघडून बायका छोटय़ा-मोठय़ा पिना दातानं पकडतात. अनेक बायका तर दाताखाली पिन पकडलेली असतानाही एका बाजूनं हसतात, गप्पाही मारतात. अशा प्रसंगी पिना अगदीच लहान असतील तर त्या श्वासनलिकेत अडकून जीवघेणो अपघात होण्याचीही शक्यता असते. आणि म्हणूनच डॉक्टरांनी तोंडात पिना ठेवणा:या, तोंडावरच्या स्कार्फला पिना लावणा:या बायकांना आपल्या या सवयी तातडीनं सुधारण्याचा सल्ला दिला आहे.