धिरडी पातोडी आणि रस्सा

धिरडी पातोडी आणि रस्सा

4 धिरडी-पातोडी  
साहित्य: डाळीचं पीठ, तिखट, मीठ, हळद,  कोथिंबीर, सारणासाठी अर्धा किलो कांद्याचा किस, 1क्क् ग्रॅम नारळाचा किस, 5क् ग्रॅम खसखस, चिमूटभर हळद, पाव चमचा भाजीचा मसाला, अर्धा चमचा साखर.
कृती: कांद्याच्या किस पिळून घ्यावा.  थोडं तेल टाकून लालसर भाजून घ्यावा. खोब:याचा कीस आणि खसखस वेगवेगळी कोरडी भाजून घ्यावी.  गार झाल्यानंतर त्यात सगळं साहित्य मिसळून एकजीव करावं.
मग धिरडं करताना डाळीच्या पिठात लाल तिखट, मीठ, हळद, कोथिंबीर, लागल्यास लसणाची पेस्ट टाकून डोश्याच्या पिठासारखं पातळसर भिजवून अर्धा तास ठेवावं. नंतर नॉनस्टिकच्या डोश्याच्या तव्यावर थोडंसं तेल टाकून डोश्याप्रमाणो पीठ पसरावं. यालाच धिरडं म्हणतात. या गरम गरम धिरडय़ात मध्यभागी कांदा-खसखशीचं सारण भरून त्याचा चपटा रोल करून थोडासा दाबावा. त्याच्या दोन ते अडीच इंचाच्या वडय़ा कापाव्या. याला पातोडी म्हणतात. ही धिरडी नुसती खायला सुद्धा छान लागतात.
4डाळदाण्याचा रस्सा
धिरडय़ाच्या पातोडीसोबत डाळदाण्याचा रस्सा आवश्यकच आहे.
साहित्य:  अर्धा चमचा हरभ:याची डाळ,  पाव चमचा तुरीची डाळ, पाव चमचा तांदूळ, 2 चमचे शेंगदाणो, एक चमचा तीळ, 1 चमचा धणो, पाव चमचा जिरे, पाव चमचा शहाजिरे, 2 काळी मिरी, 2 लवंगा, दालचिनीचा छोटासा तुकडा, दोन इंचाचा खोब:याचा तुकडा, अर्धा चमचा खसखस, एक इंचाचा आल्याचा तुकडा, 3-4 लसूण पाकळ्या, आवडीप्रमाणो मीठ, हळद आणि 5-6 लाल मिरच्या,
कृती: हे सगळं साहित्य भाजून घ्यावं, मिक्सरमध्ये पाणी घालून  छान बारीक पेस्ट करावी, तरच रस्सा छान होतो. कढईत तेल गरम करून जिरे, मोहरी व लसूण टाकून रस्सा फोडणीस घालावा. रस्सा जास्त घट्ट करू नये. पण रश्याला चांगली उकळी आणावी. धिरडय़ाची पातोडी या रश्यासोबत खावी. याच्यासोबत भाकरी-पोळीची गरज नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *