गेल्या 14 महिन्यांपासून अर्धा पगार मिळत नसल्याने जळगाव महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांनी शाळाबंद आंदोलन सुरु केलं आहे. महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर या शिक्षकांनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनामुळे महापालिकेच्या तब्बल 34 शाळा बंद असून 6 हजार विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागलं आहे.
महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने शिक्षकांना पूर्ण पगार करणे शक्य नसल्याचं मनपा प्रशासनाचं म्हटलं आहे. दरम्यान, शिक्षक आणि महापालिकाच्या प्रशासनामधे मुलांची फरफट होते आहे.
धक्कादायक म्हणजे निदर्शनांमध्ये विद्यार्थांना सहभागी करुन घेतल्याचा प्रकार घडला आहे. मुलं स्वतःच सहभागी झाल्याचं शिक्षक संघटनेनं म्हटलं आहे. तर मुलांनी मात्र शिक्षकांच्या सांगण्यावरुन सहभागी झाल्याचं सांगितलं आहे.

