नागपूरकरांची पहाट गोळीबाराच्या घटनेने उजाडली. एका व्यापाऱ्यावर आज पहाटे साडे पाचच्या सुमारास अज्ञातांनी गोळीबार केला. इस्तकार भतीजा असं या व्यापाऱ्याचं नाव आहे.
तहसील पोलिस स्टेशनअंतर्गत असलेल्या बकरामंडी परिसरातील ही घटना घडली. इस्तकार भतीजा नमाज पडून घरी परतत असताना अज्ञातांनी त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या.
या हल्ल्यात इस्तकार भतीजा गंभीर जखमी झाले असून त्यांना शुअर टेक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पोलिसांनी या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. परंतु मारेकऱ्यांचा शोध सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.

