इंजिनिअरिंगच्या क्षेत्रासमोरची आव्हानं दिवसेंदिवस बदलत आहेत. गुणवत्ताधारक शिक्षकांचा अभाव, बदलतं तंत्रज्ञान यामुळे इंनिअरिंग क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत चालला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जागा रिकाम्या आहेत.
एकेकाळी डॉक्टर्स आणि इंजिनिअर्स क्षेत्रात नाव काढण्यासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडत होती. मात्र मागच्या २ वर्षांपासून ही परिस्थिती काहीशी बदलली आहे. राज्यात इंजिनियरिंगच्या तब्बल 1लाख 56 हजार 995 जागा आहेत. मात्र राज्यभरातून केवळ 1 लाख 7 हजारच अर्ज आले आहेत. म्हणजे 49 हजार 995 जागा अजूनही रिक्त आहेत. पुणे विभागाची स्थितीही काही निराळी नाही.
पुणे विभागाची आकडेवारी
– मागील वर्षी म्हणजेच 2014-15 अभियांत्रिकीच्या एकूण 61 हजार 544 जागा होत्या. मात्र भरल्या केवळ 36 हजार 469 जागा
– म्हणजे रिक्क राहिलेल्या जागा होत्या 25 हजार 70
– तर पुण्यासह राज्यात रिक्त जागांचा आकडा होता तब्बल 45 हजार
पण आजही इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर समाजाचा ताण असतो किंवा उद्योगक्षेत्रासाठी अपेक्षित आऊटपूट देण्याची भीती असते
उद्योगक्षेत्राची जितकी मागणी आहे त्या गुणवत्तेचे इंजिनिअर्स मिळत नसल्याचा सूर आहे.
तर महाविद्यालयांची वाढलेली संख्या आणि संशोधनावर होणारं काम यात तफावत असल्यानं गुणवत्ता ढासळल्याचं शिक्षणतज्ज्ञांचं मत आहे.
मात्र गुणवत्तावाढीसाठी तसे शिक्षक मिळणंही महत्वाचं आहे. आणि गुणवत्ताधारक शिक्षक न मिळाल्यानं न भेदता येणारं एक वर्तुळ तयार झालं आहे.
जितक्या वेगानं तंत्रज्ञान बदलतंय तितक्या वेगानं गुणवत्ताधारक इंजिनिअर्स तयार होत नसल्याचं नॅसकॉमच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नोकरी लागेल की नाही अशी इतर विद्यार्थ्यांना भेडसावणारी भीती इंजिनिअर्सच्या विद्यार्थ्यांमध्येही घुसली आहे.

