अल्पवयीन पत्नीशी ठेवलेले शारीरिक संबंध हा बलात्कारच आहे, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिली. अल्पवयीन पत्नीशी शारीरिक संबंधांबाबत निर्णय घेत सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. या निर्णयामुळे 18 वर्षांखालील मुलीशी विवाह करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवणे हा यापुढे बलात्कार ठरणार आहे.
