विवाहितेच्या घरात घुसून अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी, विनयभंगाचा गुन्हा दाखल

विवाहितेच्या घरात घुसून तिचे काढलेले अर्धनग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देणा-या एका तरूणाविरूद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान खान ( वय -23) असं आरोपी तरूणाचं नाव आहे.  या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

वरळी परिसरात तक्रारदार 34 वर्षीय विवाहिता कुटुंबीयांसोबत राहते. ती गृहिणी आहे. ती राहते त्याच परिसरात सलमान राहतो.  त्याने चोरून तिचे अर्धनग्न फोटो काढले होते. ऑगस्ट महिन्यापासून  तो विवाहितेला धमकावत आहे. शुक्रवारी महिला घरात एकटी असताना तो घरात घुसला. शारीरिक संबंध ठेवण्यासोबतच पैशांची मागणी  त्याने मागणी केली नाहीतर फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची त्याने तिला धमकी दिली. महिलेने त्याचा विरोध करताच, त्याने तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

सलमानची विकृती वाढत असल्याने, तिने याबाबत कुटुंबीयांना  माहिती दिली. त्यानुसार, वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी सलमानविरुद्ध विनयभंग, शिवीगाळ, धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *