भिवंडीत इमारतीला आग, सुरक्षेसाठी २ पेट्रोल पंप बंद

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील एका इमारतीला आज शुक्रवारी आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एएनआयच्या वृत्तानुसार, इमारतीतून दहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

भिवंडीत आज एका रहिवासी इमारतीला आग लागली. यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळातच अग्निशमन दलाचे बंब आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. दहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे वृत्त एएनआयने दिले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव इमारतीजवळील दोन पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. या आगीचे कारण समजू शकलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *