फेसबुकवरील सुसाईड नोटमुळे वाचले तरुणाचे प्राण

औरंगाबाद जिल्हयातील मंठा येथील एका तरुणाने आत्महत्या करणार असल्याचा संदेश फेसबुकवर पोस्ट केला होता. ही पोस्ट वाचून औरंगाबादमधील अॅडव्होकेट स्वाती नखाते यांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. सचिन काळे पाटील असे या तरुणाचे नाव आहे. नखाते यांनी वेळीच पोलिसांना याबद्दलची माहिती दिल्याने सचिन काळे पाटीलचे प्राण वाचले.

मराठा क्रांती मोर्चामुळे सचिन आणि स्वाती यांची भेट झाली होती. यानंतर त्यांची फेसबुकवर मैत्री झाली. सचिनने काल (रविवारी) आत्महत्या करणार असल्याची पोस्ट केली होती. रात्री ८ वाजता आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. नखाते यांनी त्यांची पोस्ट पाहताच पोलिसांनी त्याबद्दलची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतले. यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नखाते यांनी फेसबुकवरील पोस्टच्या स्क्रीनशॉटच्या मदतीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर सचिनच्या फेसबुक वॉलवरुन पोस्ट हटवण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *