टेक्सासमध्ये राहणाऱ्या आयना विल्यम्सच्या नावे जगातील सर्वात लांब नखं असल्याचा विश्वविक्रम जमा आहे. विशेष म्हणजे गेल्या २३ वर्षांपासून तिने आपल्या दोन्ही हातांची नखं कापलीच नाहीत. दुसरं आश्चर्य असं की एवढ्या वाढलेल्या नखांमध्ये देखील आयना घरातील सर्व कामं अगदी सहजपणे करते. तिला काम करताना नखांमुळे कोणतीही अडचण येत नाही.
पण त्यांची काळजी घेण्यासाठी मात्र तिला दिवसातून बराच वेळ खर्च करावा लागतो हे नक्की! आयना स्वत: नेल आर्टिस्ट आहे. आपल्या नखांवर नेलपेंट लावण्यासाठी तिला एक आठवडा लागतो. दोन्ही हातांच्या नखांना नेलपेंट लावायची झालीच तर एकावेळी नेलपेंटच्या तीन बाटल्या सहज संपतात असंही ती म्हणते.
कॉलेजमध्ये असल्यापासून आपली मोठी नखं असावी असं तिला वाटायचं आणि तेव्हापासूनच तिने नखं वाढवायला सुरूवात केली. तिच्या प्रत्येक बोटाचं नख हे दोन फुट लांब आहे.
