पारंपरिक पद्धतीनं पोलिसांच्या गणपतीचं विसर्जन

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तात व्यस्त असलेल्या रायगड पोलिसांनी आज अनंत चतुर्दशीच्या दुस-या दिवशी आपल्या गणपतीचं विसर्जन पारंपरिक पद्धतीने केलं.

यंदाच्या गणेशोत्सवात डीजे वापरू नका असं आवाहन पोलिसांनी केलं होतं. पोलिसांनीही यंदा आपल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर केला. कर्नाटकी वाद्य हे यंदाच्या मिरवणुकीचं वैशिष्टय ठरलं.

पारंपरिक वेषातील महिलांचे नाच, फुगडया, लेझीम पथक आणि पोलीस बॅन्डच्या साथीनं ही मिरवणूक निघाली. पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्यासह अन्य पोलीस अधिका-यांनी यावेळी ठेका धरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *