स्मार्टफोनमध्ये दिवसाला नवनवीन फोन येऊन ग्राहकांना भुरळ घालत आहेत. यामध्ये चांगला बॅटरी बॅकअप, उत्तम कॅमेरा, जास्त मेमरी अशा विविध सुविधा दिल्या जात आहेत. लिनोव्हो कंपनीनेही आपला नवीन स्मार्टफोन भारतात नुकताच लाँच केला आहे. K8 प्लस असे या नव्या फोनचे नाव असून याबाबत ग्राहकांमध्ये मागील अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. ग्राहकांना सध्या हा फोन ऑनलाईन खरेदी करता येणार असून आजपासून फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. दुपारी १२ वाजल्यापासून हा बहुप्रतिक्षित फोन ग्राहकांना घेता येईल. विशेष म्हणजे या फोनच्या फिचर्सबरोबरच त्याची किंमतही बजेटमध्ये बसेल अशी ठेवण्यात आली आहे. लिनोव्हो K8 प्लसची किंमत १०,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
या फोनच्या खरेदीसाठी फ्लिपकार्टवर अनेक ऑफर्सही देण्यात आल्या आहेत. ७ आणि ८ सप्टेंबर रोजी हा फोन खरेदी करणाऱ्यांना फ्लिपकार्ट फॅशनवर १५ टक्के जास्तीची सूट देण्यात येणार आहे. तर ५ हजार रुपयांची बायबॅक गॅरंटीही असेल. याशिवाय १० हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देण्यात येणार आहे. याशिवाय ज्यांच्याकडे जिओचे कार्ड आहे त्यांना विशेष सुविधा देण्यात येणार आहेत. ३९९ रुपयांमध्ये जिओचा ३० जीबी डेटा देण्यात येईल. ड्युअल रिअर कॅमेरा आणि ४०००mAh क्षमतेची बॅटरी ही या फोनची वैशिष्ट्य आहेत. या फोनच्या १३ मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरामध्ये Purecel सेन्सर देण्यात आलं आहे. तर सेल्फीसाठी ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा फ्लॅशसह देण्यात आला आहे.
लिनोव्हो K8 प्लसची फिचर्स :
* अँड्रॉईड नॉगट 7.15.2 इंच आकाराची स्क्रीन
* १३ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सल असे ड्युअल रिअर कॅमेरा, ८ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
* ऑक्टाकोर मीडियाटेक हेलियो P२५ प्रोसेसर
* ३ जीबी रॅम, ३२ GB स्टोरेज, ४ GB रॅम व्हेरिएंट
* लिनोव्हो K8 प्लस हॉलीडे नावाने उपलब्ध असून त्याला ४००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
