रिझर्व बँक ऑफ इंडियाने बुधवारी २०१६-१७ वर्षाचा आर्थिक अहवाल जाहीर केला. यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नोटबंदीनंतर हा मोठा खुलासा करण्यात आला आहे.
या अहवालानुसार नोटबंदीनंतर नव्या नोटा छापण्यात आल्या त्यासाठी ७ हजार ९६५ कोटी रुपये खर्च करण्यात आला. गेल्या वर्षी तो ३ हजार ४२१ कोटी रुपये होता.
नोटाबंदीनंतर जुन्या १००० रुपयांच्या एकूण ६३२.६ करोड नोटांपैंकी ८.९ करोड नोटा आत्तापर्यंत परत आलेल्या नाहीत, अशी धक्कादायक माहिती आज आरबीआयनं जाहीर केलीय.
भारताची सर्वोच्च बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार, नोटाबंदीनंतर नव्या नोटांच्या छपाईसहीत २०१६-१७ मध्ये एकूण नोटांची रक्कम दुप्पट होऊन ७९६५ करोड रुपये झालीय. २०१५-१६ मध्ये ही रक्कम ३४२१ करोड रुपये होती.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लागू करण्यात आलेल्या नोटाबंदी दरम्यान देशातील चलनात राहिलेल्या १५.४४ लाख करोड रुपयांच्या बंदी घालण्यात आलेल्या नोटांपैंकी १५.२८ लाख करोड रुपये आरबीआयकडे जमा करण्यात आल्यात.
