कल्याणमध्ये गोडाऊनची भिंत कोसळली, ४ जण ढिगाऱ्याखाली

गोडाऊनची भिंत अंगावर पडून ४ जण खाली दबल्याची घटना कल्याण  पूर्वेच्या चक्की नका भागात घडलीय. चक्की नाका इथली एका बंद गोडाऊनची भिंत कोसळण्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली.

या गोडाऊनच्या आत झोपलेले ४ जण या ढिगाऱ्याखाली अडकले होते. मात्र, स्थानिकांनी तात्काळ धाव घेत या चौघांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यामुळे या चौघांचे जीव वाचण्यात मदत झाली. चौघांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

हे चौघे गणपती ढोल पथकातील असून गणपती सणानिमित्त कल्याणला आले होते. रात्रीच्या वेळी या बंद गोडाऊनमध्ये झोपत होते. जोरदार पावसामुळे या गोडाऊनची इमारत जीर्ण झाल्याने भिंत खचली आणि हा अपघात घडला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *