मुंबईत चार मजली इमारत कोसळून ४ ठार, ३५ जण ढिगाऱ्याखाली

शहरातील भेंडीबाजार परिसरात चार मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ३० ते ३५ जण अडकल्याची भिती व्यक्त होत आहे. ही घटना सकाळी ८.३२ वाजता घडली. ढिगाऱ्याखालून चार मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. यात एका चिमुकलीचा समावेश आहे. तर अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झालाय.

घटनास्थळी अग्नीशामन दलाचे जवान पोहोचले आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीचे नाव आर सी वाला बिल्डिंग आहे. इमारत ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.या इमारत दुर्घटनेत ५ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहेत. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आलेय. आणखी काही जण अडकल्याची भिती व्यक्त होत आहे.

भेंडीबाजत येथील इमारत दुर्घटनेत चार मृतदेह बाहेर काढले आहेत. यात एका लहान मुलीचा समावेश आहे. तर जखमी झालेल्या ५ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. या जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आलेय. दरम्यान, ३० ते ३५ जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

या इमारतीत ५ कुटुंब राहत होते. इमारतीमधील एका खोलीत सुमारे ८ ते १५ लोके राहत होती. त्याचसोबत इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरमघ्ये मिठाईवाल्याचे वर्कशॉप होते. येथे १५-२० कर्मचारी काम करत होते. त्यामुळे आणखी लोक ढिगाऱ्याखाली दबल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *