ज्येष्ठ नागरिक माधव वैद्य पावसात बेपत्ता

मंगळवारच्या पावसात अनेक जण अडकले होते… काही जण अद्यापही घरी परतलेले नाहीत.

सकाळी कामानिमित्त अनेक जण बाहेर पडले खरे मात्र पावसाचा जोर वाढल्यामुळे अनेकांना मुंबईत विविध ठिकाणी आणि स्टेशन्सवर थांबावं लागलं. अशाच लाखो मुंबईकरांपैकी एक असलेले माधव वैद्य हे ज्येष्ठ नागरिक कामानिमित्त मुलुंडहून बोरीवलीच्या राजेंद्रनगर पोस्ट ऑफिसमध्ये गेले होते. मात्र अद्यापही ते घरी परतलेले नाहीत.

पावसाचा जोर ओसरलाय आणि रस्ते तसंच रेल्वे वाहतूकही हळूहळू पूर्वपदावर येत आहे. असं असतानाही माधव वैद्य घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढलीय. त्यातच फोनवर संपर्क झालेला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुबीयांच्या काळजीत आणखीनच भर पडलीय.

 माधव वैद्य यांचा शोध घेण्यासाठी आता त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियाचाही आधार घेतलाय. तरीही त्यांचा संपर्क झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *