डॉ. दीपक एन. अमरापूरकर यांचा मृतदेह सापडला. वरळी कोळीवाडा समुद्रात डॉ. अमरापूरकर यांचा मृतदेह सापडला आहे.
मंगळवारी मुंबईत झालेल्या तुफान पावसात बाहेर पडलेले डॉ. अमरापूरकर बेपत्ता झाले होते. लोअर परळला घरापासून १० मिनिटांच्या अंतरावर मॅनहोलमध्ये ते पडल्याचं सांगण्यात येत होतं.
घटनास्थळी त्यांची छत्रीही आढळली होती. त्यानंतर घरी न परतलेल्या डॉ. अमरापूरकर यांचा शोध सुरु होता.
बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट असणाऱ्या डॉ. अमरापूरकर यांचा बीएमसीचे कर्मचारी आणि डायव्हर्सच्या मदतीनं शोध घेण्यात येत होता. तसंच एनडीआरएफची टीमही त्यांचा शोध घेत होती.
