२४ व्या पुण्यतिथीनिमित्त माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली

२४ व्या पुण्यतिथीनिमित्त माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना श्रद्धांजली

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह इतर नेत्यांनी वीरभूमीवर जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.

राजीव गांधी यांच्या पत्नी आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह उपाध्यक्ष राहुल गांधी, कन्या प्रियंका गांधी, जावई रॉबर्ट वडेरा यांनी वीरभूमीवर त्यांना पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पीसी चाको, ऑस्कर फर्नांडिस, गुलाम नबी आझाद, अजय माकन हे नेते यावेळी उपस्थित होते.

राजीव गांधी यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर गांधी कुटुंबाने शक्ती स्थळावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही आदरांजली वाहिली.

२१ मे १९९१ रोजी राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. निवडणूक प्रचारादरम्यान तमिळनाडूतील श्रीपेरुम्बुदूर येथे हत्या करण्यात आली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *