विमान रोखण्याबाबत मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा?, सचिवाशिवाय प्रवासाला नकार दिल्यानेच खोळंबा

एअर इंडियाच्या विमानाचं उड्डाण लांबल्याप्रकरणी मुख्यमंत्री खोटं बोललेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, एअर इंडिया आणि सीएमओ यांच्यात झालेल्या संभाषणाचा ई-मेल माध्यमांच्या हाती लागला आहे. ज्यात विमान हे तांत्रिक कारणातून नाही तर मुख्यमंत्र्यांच्या सचिवांमुळेच लांबल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

अमेरिकेला जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीणसिंग परदेशी व्हिसा घरी विसरल्यामुळे विमानाचं उड्डाण नियोजित वेळेपेक्षा 1 तास 20 मिनिटं लांबल्याचं वृत्त होतं. मात्र विमान तांत्रिक कारणातून उशिराने उडाल्याचं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी तातडीने देत स्पष्टीकरण दिलं होतं. त्यामुळे आता नव्याने समोर आलेल्या मेलसंदर्भात मुख्यमंत्री काय उत्तर देतात, हे पाहावं लागणार आहे

सोमवारी मध्यरात्री एअर इंडियाचं एआय 191 हे विमान तब्बल सव्वा तास धावपट्टीवरच रोखून धरण्यात आलं. यावेळी जवळपास दोनशेहून अधिक प्रवासी या विमानात होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *