चेन्नई मेट्रोमधून प्रवास करताना द्रमुकचे नेते एम.के.स्टॅलीन यांनी एका प्रवाशाच्या श्रीमुखात लगावल्याची घटना घडली आहे.
स्टॅलीन यांचा हा व्हिडीओ वृत्तवाहिन्यांवर प्रसारीत झाल्यानंतर तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी स्टॅलीन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका आमदाराने असे वागणे योग्य नव्हे. भविष्यात स्टॅलीन असे वागणार नाहीत अशी मी अपेक्षा करते असे जयललिता यांनी म्हटले आहे.
स्टॅलीन यांनी जयललितांचे आरोप फेटाळून लावले आहेत. जयललिता माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत हे आरोप म्हणजे माझ्या विरुध्दचा कट आहे असे स्टॅलीन यांनी सांगितले.
या घटनेसंबंधी स्पष्टीकरण देताना स्टॅलीन म्हणाले की, मी प्रवाशाच्या श्रीमुखात लगावली नाही. अजणातेपणी त्या माणसाचा तिथे बसलेल्या मुलीला पाय लागत होता. जेव्हा मी त्या माणसाला तिथून पुढे जाण्यास सांगितले तेव्हा माझा हात त्याच्या चेह-याला लागला. मी त्याच्या श्रीमुखात भडकवली नाही. जयललिता हे का समजून घेत नाहीत ?

