वाकोल्यात पोलीस निरीक्षकाच्या पत्नीची हत्या

वाकोला परिसरात पोलीस निरीक्षकाच्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे. मंगळवारी ही हत्या झाली आहे. घरी पत्नी एकटीच असताना ही हत्या करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान पोलीस निरीक्षकाच्या घरात घुसून अशाप्रकारे हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तपास सुरु केला असून या हत्येमागे ओळखीच्या व्यक्तीचा हात असण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंगळवारी ही हत्या झाली असून पोलीस निरीक्षक घरी आले असता त्यांना आपली पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. पत्नीला तातडीने व्ही एस देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु केला आहे. हत्या झाली तेव्हा त्या घऱी एकट्याच होत्या. हत्येमागे घरातलं कोणी आहे की बाहेरचं याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *