अहमदनगरमध्ये भीषण अपघातात पुण्याचे सात जण जागीच ठार

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बोलेरो जीपने जीपने समोरुन येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात जीपमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. नगर जवळील धनगरवाडी गावजवळ हा भीषण अपघात झाला.
सर्व मृत पुणे जिह्यातील यवत येथील रहिवासी आहेत. हे सर्वजण बोलेरो जीपने सैलानी बाबांच्या दर्शनाला चालले होते. रात्री दोनच्या सुमारास बोलेरो जीपच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले, आणि जीपने औरंगाबादकडून नगरकडे येणा-या ट्रकला जोराची धडक दिली.
अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर हा भीषण अपघात झाला. समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या या अपघातात जीपमधील सर्व सात जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व मृतदेह नगरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
मृतांची नावे-
1)मनोहर रामभाऊ गायकवाड-४५
2)अंकुश दिनकर नेमाने-45
3)मुबारक अबनास तांबोळी-52
4) बाळू किरण चव्हाण-50
५)स्वप्नील बाळू चव्हाण-17
6)गोकुळ रामभाऊ गायकवाड-40
7)अरुण पांडुरंग शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *