काँग्रेसचा लोकांनी शिखांवर हल्ला केला किंवा अनन्या केला अस एक मंत्री पंजाबमधे जाऊन बोलले. त्यानी लक्षात घ्याव इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी जीवच बलिदान दिलं आहे, असे विधान शरद पवार यांनी केले. नेहरू गेल्यानंतर इंदिरा गांधी यांनी देशासाठी काम केलं पाकिस्तानला धडा शिकवला, त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांची देखील हत्या झाली. त्यामुळे नेहरू कुटुंबाचा त्याग कुणी विसरू शकत नाही. त्यामुळे त्यांची कुणासोबत तुलना होऊ शकत नाही, असेही ते पुढे म्हणाले.
मंत्रिमंडळातील एका नेत्याने इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली. पण जगात देशाची प्रतिमा वाढवण्यामधे इंदिरा गांधी यांचा हात आहे. त्यांनी देशाच्या प्रतिमेशी कधीही तडजोड केली नाही, असे शरद पवार म्हणाले. इंदिरा गांधी मास्कोला गेल्या होत्या. त्या मॉस्को विमानतळावर उतरल्या त्यावेळी त्यांच्या स्वागताला काही काही अधिकारी होते. ज्यावेळी त्या उतरल्या त्यावेळी त्यांच्या दर्जाचा व्यक्ती आले नव्हते. त्याठिकाणी भारतीय दूतावास याना इंदिरा गांधी यांनी विचारल आपलं शेड्युअल काय आहे? त्यांनी देशाच्या प्रमुखांना भेटायला जायचं आहे सांगितलं. त्यावेळी इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या मला तुमच्या घरी यायचं आहे. गुजराल नावाचे भारतीय दूतावास होते त्यांच्या घरी त्या गेल्या. इंदिरा गांधी यांनी घरी गेल्यावर लहान मुलाना बोलवायला लावल आणि त्यांच्यासोबत खेळू लागल्या. रशियाचे अध्यक्ष भेटायला थांबले होते परंतु इंदिरा गांधी यांनी जाण पसंद केल नाही. त्यांनी सांगितल मी इथे आले त्यावेळी यांच्या देशाच्या प्रमुखांनी येणे अपेक्षित होते.परंतु ते आले नाहीत. मी इथे इंदिरा गांधी म्हणून नाही तर 40 कोटी जनतेचे प्रतिनिधी म्हणून आले आहे, अशी आठवण पवारांनी यावेळी सांगितली.
गिरीश महाजनांवर निशाणा
शिखावर हल्ला करणारे त्यांचं नुकसान करणारे काँग्रेस नेतृत्व होत, असं महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी केलेलं वक्तव्य हे अजिबात आम्हाला मंजूर नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.आज खतांसाठी रांगा लागू लागल्या आहेत. शेतकरी संकटात आहेत. देशाच्या अन्न धन्याचा प्रश्न सोडवणे सरकारची जबाबदारी आहे. पुढील 8 ते 10 दिवसांत बसूया. विविध प्रश्नांवर चर्चा करूया. सरकारला प्रश्न विचारुया, असे पवार म्हणाले.
देशात महागाईचा प्रश्न
आपण सत्ता असले तर सत्तेत काम करतो नसेल तर जनतेत काम करतो. आता आपण काम करत असताना महिला अत्याचार, महागाई सारख्या प्रश्न सध्या देशत आहे.नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत ते संस्थात्मक पदावर आहेत. माझा 2 गोष्टी पाहण्यात आल्या. एक गृहस्थ जवाहरलाल नेहरू बाबत बोलले.
मोदी-नेहरु तुलनेवर काय म्हणाले?
सध्या नेहरू बाबत स्पर्धा लावली जात आहे. आता नेहरू यांच्यासोबत तुलना होऊ शकते का? अनेक वर्ष प्रधानमंत्री होते. इंग्रजांच्या अत्याचारातून मुक्त करण्याचं काम नेहरू यांनी केलं ते आपण विसरू शकत नाही, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
