विधान परिषदेत नाशिकच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण नाशिकच्या जागेवर बंडखोरी करणाऱ्या गोकुळ गिते यांनी अद्याप माघार घेतलेली नाही. शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि भाजप नेते गिरीश महाजन हे दोन्हीं मंत्री तीन दिवसापासून नाशिकमधे तळ ठोकून होते. काल त्यांच्या जोडीला मंत्री दादा भुसे देखील होते. तिन्ही महत्वाचे मंत्री आपल्या विभागाचा कारभार सोडुन बडखोरांची मनधरणी करण्यात व्यस्त होते. त्यात अल्पसं यश आलं खरं आणि प्रसाद हिरे यांनी माघार घेतली. मात्र गोकुळ गिते अजूनही निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकून आहे.
दरम्यान, रात्रीपर्यंत गोकुळ यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आधी मंत्री गिरीश महाजन आणि नंतर उदय सामंत, दादा भूसे याचीही गोकुळ गिते यांच्यासोबत चर्चा झाली. तरीही अपयश आल्यानं आज महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे, गणेश गिते यांच्या भेटीसाठी आले आहेत.
अशातच, कालपर्यंत उदय सामंत, गिरीश महाजन दोघेही प्रयत्न करत होते. मात्र आज शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करण्याची शक्यता असून गितेच्या उमेदवारीमुळे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे संशय्याची सुई आहे. गिते बंधू महाजन यांचे निकटवर्तीय असल्याने महाजन याच्या सांगण्यावरून उमेदवारी आहे का? गिते हे महाजन यांचेही का ऐकत नाही? असा सवालही आता राजकीय वर्तुळातून उपस्थित होत आहे.
दरम्यान, गोकुळ गीते यांच्या समजूतीसाठी आलेल्या उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांना गोकुळ गीते यांची मनधरणी करण्यात अपयश आले आहे. आपण निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचा गोकुळ गीते यांची महायुतीचे संकटमोचक गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे वरिष्ठ नेते गिरीश महाजनांचा फोन आला. त्यावेळी त्यांनी भेटीसाठी बोलावलं. यावेळी मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन यांची भेट घेऊन यावेळी चर्चा केली. या चर्चे दरम्यान असं कळलं कि प्रसाद हिरेंनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. तास पाठिंबा आपण देखील देऊ शकतो का? असं विचारण्यात आलं. मात्र मी स्पष्टपणे नकार दिला. मतदारांचा कौल बाघता नकार दिला तर तो मतदारांसोबतच घात असेल. असेही गोकुळ गीते म्हणाले.
Who is Gokul Gite?: कोण आहेत गोकुळ गीते?
गणेश गीते यांनी माघार घेतली असली, तरी गोकुळ गीते यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण राज्याचे लक्ष नाशिककडे लागले आहे.
– गोकुळ गीते हे नाशिकचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे भाऊ आहेत.
– गणेश गीते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत गोकुळ गीते यांचा पडद्यामागून मोठा हातभार राहिला आहे.
– नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. या संपूर्ण निवडणुकीचे नियोजन आणि कॅम्पेन गोकुळ गीते यांनीच सांभाळले होते.
– गोकुळ गीते हे पिंपळगाव बाजार समितीवर सलग दोन वेळा संचालक म्हणून निवडून आले आहेत, तर सध्या त्यांची सायखेडा गटातून जिल्हा परिषद निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे. स्थानिक पातळीवर त्यांची मोठी ताकद मानली जाते.
