जून महिना आला की शाळा सुरु कधी होणार? याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागलेले असते. राज्यातील शाळा सुरू होण्याबाबत महत्त्वाचा बदल जाहीर करण्यात आलाय. उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील शाळा सुरू होण्याची तयारी सुरू असतानाच शिक्षण विभागाने शाळांच्या वेळापत्रकाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील बहुतांश भागातील शाळा 15 जूनपासून नियमितपणे सुरू होणार आहेत. मात्र, विदर्भातील तीव्र उष्णतेची परिस्थिती लक्षात घेऊन तेथील शाळांच्या प्रारंभाबाबत स्वतंत्र निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
उष्णतेमुळे विदर्भासाठी वेगळा निर्णय
शिक्षण विभागाचे परिपत्रक आणि पुढील घडामोडी
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच 22 ते 30 जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे निर्देश देण्यात आले होते. 1 जुलैपासून नियमित वेळेनुसार अध्यापन सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय
दरम्यान, या प्रकरणात नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण भूमिका घेत विदर्भातील शाळा 30 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी काही दिवसांचा दिलासा मिळणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयामागे विद्यार्थ्यांचे आरोग्य, वाढते तापमान आणि उष्माघाताचा धोका ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. या निर्णयामुळे विदर्भातील लाखो विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कोणत्या शाळा कधी सुरू होणार?
सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार, राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आदी भागांतील शाळा 15 जूनपासून सुरू होणार आहेत. मात्र, विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा नागपूर खंडपीठाच्या निर्णयानुसार 30 जूनपासून सुरू होतील. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी स्थानिक प्रशासन व शिक्षण विभागाकडून जारी होणाऱ्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भातील शाळा कधीपासून?
विदर्भातील शाळा 30 जूनपासून सुरु होणार आहेत. यासंदर्भात नागपूर खंडपीठाने महत्वाचा निर्णय घेतलाय. उन्हामुळे विदर्भातील शाळा 30 जूनपासून सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरु करण्याच परिपत्रक शालेय शिक्षण विभागने काढलं होतं. या पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठाने हा निर्णय जाहीर केलाय.
