फिरता पंखा थेट अधिका-याच्या डोक्यावरच पडून अधिकारी जखमी

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातल्या पुरवठा विभागात अधिका-याच्या डोक्यात फिरता पंखा पडल्याने अधिकारी जखमी झाल्याची घटना घडलीये.

जिल्हाधिकारी कार्यालयात एका ठिकाणी नाही तर दोन ठिकाणी एकाच दिवशी घडलेल्या या घटनांमुळे, हा अपघात की घात या चर्चेनं जोर धरला. या घटनेत एक जेष्ठ अधिकारी जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

उन्हाळ्याच्या दिवसांत पंख्याशिवाय गत्यंतर नसतं. मात्र हाच पंखा यमदूतही ठरु शकतो. त्यामुळे प्रत्येकानं आपल्या घरातला तसंच कार्यालय आणि दुकानातल्या पंख्याचं फिटिंग तपासून घेणं गरजेचं आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातल्या या घटनेची सीसीटीव्ही दृश्यं पाहून या घटनेची गंभीरता लक्षात येऊ शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *