१५ लाखांचे दागिने चोरणार चोर जेरबंद

पुण्यात १५ लाख रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने   चोरणा-याला रेल्वे पोलिसांनी अटक केली. लक्ष्मण काळे असं या आरोपीचं नाव आहे.

पुण्यातले विनायक जोशी कुटुंबासोबत मुंबई हैदराबाद रेल्वेनं हैदराबादला निघाले असताना, त्यांच्या पत्नीच्या हातातली बॅग या चोरानं पुणे स्टेशनवरुनच हातचलाखीनं चोरली.

कुरडवाडीला गेल्यावर ही गोष्ट जोशी कुटुंबाच्या लक्षात आली. त्यांची तक्रार आणि आरोपीच्या वर्णनावरून पोलिसांनी विनायक जोशीला ताब्यात घेतलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *