सिद्धिविनायक न्यासाला ISO दर्जा, उत्कृष्ट व्यवस्थापनाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

सिद्धिविनायक न्यासाला ISO दर्जा, उत्कृष्ट व्यवस्थापनाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सिद्धीविनायकाची पूजा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांकडून सिद्धीविनायक न्यासाला आययएसओ प्रमाणपत्र बहाल करण्यात आल. बीएसआय संस्थेच्या पुढाकारानं सिद्धीविनायक न्यासाला उत्कृष्ठ व्यवस्थापनासाठी हे प्रमाणपत्र देण्यात आलं.

यावेळी मुख्यमंत्र्यांना सिद्घीविनायकाची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली. सिद्धीविनायक मंदिर मंडळ अनेक समाजोपयोगी कार्यामध्ये पुढे असतं. त्याचा गौरव म्हणून आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात आलं.

सिद्धीविनायक मंदिरात रोज हजारो भक्त दर्शन घेतात. याठिकाणची शिस्तबद्धता आणि उत्कृष्ठ व्यवस्थापन उत्तम नमुना मानला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *