२३ मे रोजी जयललिता घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

२३ मे रोजी जयललिता घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता झालेल्या अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जे.जयललिता पुन्हा एकदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

पक्षाच्या आमदारांनी त्यांना भेटून त्यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केल्यानंतर येत्या २३ मे रोजी त्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

विद्यमान मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम २२ मे रोजी राजीनामा देतील आणि २३ मे रोजी जयललिता यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होईल असे अण्णाद्रमुकचे प्रवक्ते सी.आर.सरस्वती यांनी सांगितले.

११ मे रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने जयललिता यांची बेहिशोबी मालत्ता प्रकरणाच्या सर्व आरोपातून निर्दोष मुकत्तता केल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला होता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *