प्रेम संबंधांतनंतर लग्नासाठी टाळाटाळ केल्याच्या रागातून प्रियकराने भररस्त्यात प्रेयसीची हत्या केली. मुंबईच्या काळाचौकी परिसरात ही खळबळजनक घटना घडली.
आरोपी प्रसाद सावंत आणि एकता तळवलकर यांचे 11 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबियांचा त्यांच्या संबंधांना विरोध होता. त्यामुळे कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न करण्यासाठी प्रसाद एकतावर दबाव टाकत होता. रविवारी प्रसादचा एकताशी लग्नाच्या मुद्द्यावरुन पुन्हा वाद झाला.
याच रागातून असलेल्या सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास दारुच्या नशेत असलेल्या प्रसादने एकताच्या मानेवर चाकूने वार केले आणि त्यानंतर पोलिसांत आत्मसमपर्ण केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
तर दुसरीकडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या एकताला जवळच्या केईएम रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.

